Monday, June 28, 2010

आदर्श

आदर्शांपाठी धावणाऱ्यांनो !
द्या गुलाबाच्या काट्याकडे लक्ष
अपमान नम्रतेने झेलून असतो
तो सौंदर्याच्या संरक्षणात दक्ष

झरे जोरात वाहतात आणि सुकतात
शांत समुद्र असतात सखोल
मिरवायला काय सगळेच मिरवतात
पण खरा आदर्श असतो अबोल

धैर्य, शौर्य, सात्वना आणि यश
असनं मिळालेलं सगळंच खोटं
शेवटी त्याच्या घरी सगळेच सारखे
नाही कोणी लहान, नाही मोठं

मला पराजयाची भिती नका दाखवू
माझं जिवनच आहे एक संघर्ष
डोळे उघडून विचार करा
तुम्हीच बना तुमचा आदर्श

मंदी चालू आहे सखे

मंदी चालू आहे सखे , मंदी चालू आहे
कविता लिहून लिहून शाई संपली आहे
तुझी माझी आठवण आज मी विकली आहे
साखरपुड्याची अंगठी बाजारात गेली आहे

जगात आता सगळे झाले महाग
कशी मी ग विझवू या पोटाची आग
रेल्वेचा पास आजच संपला आहे
काल मला नौकरीवरुन काठ्न्यात आले आहे

उरलेले पैसे हातात आले आहेत
आणि बँकेचे हफ्ते राहिलेले आहे
घरातली ट्यूब लाईट बंद पडली आहे
जाऊ दे !आता तर अंधारात राहायचे आहे

नात्यांपेक्षा पैसा मोठ्ठा झालेला आहे
विश्वसापेक्षा गरजा प्रबळ ठरलेल्या आहेत
तुला तर ऐ.सी. मध्ये रहायची सवय आहे
इथे मंदिरात झोपण्याची वेळ आली आहे

अशी काही माझी गाथा आहे
काळ माझ्यावर स्वार झाला आहे
मी आता सगळच गमाउन बसलो आहे
खरच सांगतो सखे मंदी ही चालूच आहे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुचलेली कवीता....

घेऊन हाती मशाल क्रांतीची
घालू पालथी अवघी पृथ्वीची,

राजा कुणी ना रंक आता
ह्या तर झाल्या जुन्या बाता,

सान-थोर सारे एक जमू
एकच ध्यासाने आता लढू,

बाजूला ठेऊ सारे पोथी पंथ
आणू एकत्र सारे साधू संत,

राग कुना ना कुणास रुसवा
बासनात आता हो मतभेद वसवा,

तमा न बाळगू आता कुणाची
घराणेशाही राजकारणाची ना पोपटपंची नेत्यांची,

एकदिलाने एकजुटीने आता पुढेच जाऊ
ध्येयप्राप्तीशिवाय न आता माघारी येऊ.